रत्नागिरी दि.20:- अन्न व औषध प्रशासन विभागास 15 सप्टेंबर 2021 रोजी रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील मे. बी.के.पवार अँड सन्स येथे प्रतिबंधित पदार्थ-गुटखा पानमसाला इत्यादीची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने अन्न सुरक्षा अधिकारी श्री. पाचपुते, श्री. वाबंळे, श्री. गुंजाळ यांनी सदर पेढीस भेट देवून तपासणी केली. या तपासणीमध्ये 520 ढेप काळा गुळ (अंदाजे वजन 10400 किलो) आढळून आला. त्याबाबत दुकान मालक प्रविण पवार यांचेकडे विचारणी केली असता सदर काळा गुळ पशुखाद्य म्हणून वापरत असल्याचे सांगितले. याबाबत कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने सदरचा काळा गुळ हा हातभट्टी दारु तयार करण्यासाठी वापरला जात असल्याच्या संशयावरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी कायद्यातंर्गत तरतुदीनुसार नमुने घेणे/काळा गुळ जप्त करणे अशी कारवाई केल्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन (म. राज्य) रत्नागिरी यांनी कळविले आहे.














