सोलापूर (क्री. प्र.), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने अजितकुमार संगवे यांची प्रसिद्धी समिती सदस्यपदी नियुक्ती केली असल्याचे असोसिएशनचे सरचिटणीस ॲड. गोविंद शर्मा यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र संगवे यांना देण्यात आले. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, उत्कर्ष क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष रविन्द्र नाशिककर व जिल्हा खो खो असोसिएशनचे खजिनदार श्रीरंग बनसोडे आदी उपस्थीत होते.
श्री संगवे हे सुवर्ण पदक विजेते राष्ट्रीय खो-खो खेळाडू आणि सुवर्ण पदक विजेते खो खो संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक आहेत. ते खो-खोचे राष्ट्रीय पंचही आहेत. त्यांनी या अगोदर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे प्रसिद्धी समिती चेअरमन व सचिव आणि महाराष्ट्र खो खो संघाचे निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.