
अध्यक्षपदी श्री. शिवाजी जगन्नाथ सावंत विजयी; १४ही उमेदवारांचा विजय
मुंबई, ता. 7: मुलुंड येथील मराठा समाजाचे मानाचे स्थान असलेल्या ‘मराठा मंडळ, मुलुंड, मुंबई’च्या त्रैवार्षिक निवडणुकीत (२०२६–२०२९) ‘अजिंक्य पॅनल’ने दणदणीत विजय मिळवत परिवर्तन आणि विकासाच्या विचारांना सभासदांनी स्पष्ट कौल दिला.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत श्री. शिवाजी जगन्नाथ सावंत यांनी ८०० पैकी ५५८ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला.
कार्यकारिणीच्या १४ जागांवरही अजिंक्य पॅनलचे सर्व १४ उमेदवार विजयी झाले असून, पॅनलने एकतर्फी यश मिळविले. या मध्ये सौ. शुभदा म्हामुणकर (५३४ मते), श्री. संतोष सावंत (५२८ मते), श्री. विनय शेलार (५१९ मते), सौ. सोनाली सावंत (५१९ मते), श्री. रमेश शिंदे (५१६ मते), श्री. दीपक राणे (५१५ मते), श्री. सचिन पाटील (५१३ मते), श्री. रवींद्र सावंत (५१२ मते), श्री. संतोष महाडिक (५१० मते), श्री. वैभव राणे (५०९ मते), श्री. अरुण चव्हाण (५०८ मते), श्री. दीपक सावंत (५०७ मते), श्री. मनोहर जुचरे (४९१ मते) आणि श्री. निलेश सुर्वे (४८२ मते) हे १४ शिलेदार भरघोस मताधिक्याने विजयी झाले आहेत.
मंडळाच्या इतिहासातील या निवडणुकीत सभासदांनी व्यक्तीपेक्षा संस्था, पारदर्शकता, विकास आणि नव्या नेतृत्वाला पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले. ‘अजिंक्य’ पॅनलचा हा विजय केवळ उमेदवारांचा नसून मंडळाच्या प्रत्येक सभासदाचा, हितचिंतकाचा आणि मार्गदर्शकाचा विजय असल्याची भावना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सभासदांनी दाखविलेला विश्वास आणि प्रेम हीच पुढील वाटचालीची प्रेरणा असून, पारदर्शक, सकारात्मक आणि सर्वसमावेशक कारभार करण्याची ग्वाही नवनिर्वाचित कार्यकारिणीने दिली.
विजयाचा आनंद निश्चितच मोठा आहे; मात्र त्याहून मोठी जबाबदारी आता आपल्या खांद्यावर आली आहे, अशी भावना व्यक्त करत मंडळाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
या ऐतिहासिक विजयाबद्दल अजिंक्य पॅनलचे अध्यक्ष व सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.














