मुंबई, 09 डिसेंबर 2024:भारती एअरटेल भारतातील पहिले स्पॅम-फायटिंग नेटवर्क आहे आणि त्याने तब्बल 8 बिलियन स्पॅम कॉल्स व 0.8 बिलियन स्पॅम एसएमएस चिन्हांकित केले आहेत. हे त्याने एआय-संचालित, स्पॅम-फायटिंग सोल्यूशन सुरु केल्यानंतर अडीच महिन्यांच्या आत करून दाखविले आहे. या प्रगत अल्गोरिदमचा वापर करून, एआय-संचालित नेटवर्कने दररोज सुमारे 1 मिलियन स्पॅमर्सची सफलतापूर्वक ओळख पटविली आहे.
गेल्या अडीच महिन्यांमध्ये कंपनीने सुमारे 252 मिलियन असाधारण ग्राहकांना या संशयास्पद कॉल्सबाबत धोक्याची सूचना दिली असून तसे कॉल्स उचलणाऱ्या ग्राहकांची संख्या 12% नी घटली आहे, असे निदर्शनास आले आहे. एअरटेल नेटवर्क वरील सर्व कॉल्सपैकी सहा टक्के कॉल्सची ओळख स्पॅम कॉल्स म्हणून पटविली गेली आहे, तर सर्व एसएमएस पैकी 2% स्पॅम असल्याची ओळख पटविली गेली आहे. विशेष म्हणजे तब्बल 35% स्पॅमर्सने लँडलाईन टेलिफोनचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे.
याव्यतिरिक्त, दिल्ली मधील ग्राहकांना सर्वात जास्त स्पॅम कॉल्स केले गेले आहेत, त्या पाठोपाठ आंध्र प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील ग्राहकांना असे कॉल्स केले गेले आहेत. सर्वात जास्त स्पॅम कॉल्स *दिल्लीत* सुरू झाले असून, त्या पाठोपाठ *मुंबई* आणि *कर्नाटकचा* क्रमांक लागतो. एसएमएस च्या बाबतीत म्हणायचे झाले तर सर्वात जास्त संख्या गुजरात मधून सुरू झाली होती आणि त्या पाठोपाठ कोलकाता आणि उत्तर प्रदेश मध्ये कॉल्स सुरू झाले आणि मुंबई, चेन्नई आणि गुजरात मध्ये लक्ष्यित ग्राहकांची जास्तीत जास्त संख्या पहायला मिळते.
ट्रेंड पहायला गेलो तर एकूण स्पॅम कॉल्सपैकी 76% कॉल्स मध्ये पुरुष ग्राहकांना लक्ष्य केले गेले होते. याव्यतिरिक्त, वयोगटातील लोकसंख्येमध्ये स्पॅम कॉल वारंवारतेच्या बाबतीत भिन्न फरक दिसून आले आहेत. 36 ते 60 वयोगटातील ग्राहकांना सर्व स्पॅम कॉल्सपैकी 48% कॉल्स केले गेले होते, तर 26-35 वयोगटातील ग्राहकांना त्यानंतर सर्वात जास्त लक्ष्य केले गेले होते आणि हे स्पॅम कॉल्सच्या 26% आहे. सुमारे 8% स्पॅम कॉल्स ज्येष्ठ नागरिकांच्या हँडसेटमध्ये पहायला मिळतात.
स्पॅम हालचालींचे तासागणित वितरण सुद्धा कंपनीच्या निष्कर्षांनी स्पष्ट केले आहेत. स्पॅम कॉल्स सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होतात आणि जसजसा दिवस वाढत जातो तसतसे हळूहळू त्यांचे प्रमाण वाढत जाते. दुपार 12 ते दुपारी 3 या वेळेत स्पॅम हालचालींचा शिखर पाहिला गेला असून यादरम्यान स्पॅम कॉल्सचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे आढळते. याखेरीज, आठवड्यातील दिवस आणि आठवड्याच्या शेवटी स्पॅम कॉल्सच्या वारंवारतेत उल्लेखनीय तफावत आहे. रविवारी या कॉल्सचे प्रमाण सुमारे 40% नी कमी होते. विशेषतः रु. 15,000 ते रु. 20,000 च्या किंमतीच्या श्रेणीतील डिव्हाइसेसवर सर्व स्पॅम कॉल्सच्या अंदाजे 22% कॉल्स केले जातात.
अनेक मापदंडांची बारकाईने तपासणी केली गेली आहे आणि एआय- संचालित प्रणालीला विलक्षण अचूकता राखून वास्तविक काळात ही नको असलेली लुडबूड ओळखता आलेली आहे. या अभूतपूर्व उपक्रमाने एअरटेलला भारतातील पहिली सेवा प्रदाता म्हणून ठामपणे स्थापित केले आहे जिने स्पॅमच्या वाढत्या धोक्यावर सर्वसमावेशक तोडगा प्रदान केला आहे, विशाल ग्राहक आधाराच्या गोपनीयता आणि सोयीला प्राधान्य देणाऱ्या सर्वसमावेशक सुरक्षा उपायांसाठी नवीन उद्योग मानके स्थापित केली आहेत.