ग्राहकांना घरबसल्या स्वयं-केवायसी प्रक्रिया करून जलद व सुरक्षित पद्धतीने ते सक्रिय करता येणार
मुंबई, 15 एप्रिल, 2025 : एक प्रवर्तक पाऊल टाकून भारती एअरटेलने आज ब्लिंकिट या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म सोबत भागीदारीची घोषणा केली आहे जेणेकरून मुंबई मधील ग्राहकांना दहा मिनिटांत सिमकार्ड पोहोचविता येणार आहे. एखाद्या टेलिकॉम कंपनी कडून ही पहिलीच सेवा असून आता देशातील 16 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे आणि कालांतराने आणखी शहरांना आणि गावांना जोडण्याची योजना आखली गेली आहे.
हे सहकार्य एक महत्त्वपूर्ण टप्पा दर्शवित असून चालत आल्याप्रमाणे ग्राहकांना आता ₹49 एवढ्या नाममात्र सुविधा शुल्कात किमान 10 मिनिटांत घरपोच सिमकार्ड प्राप्त करता येईल. सिमकार्ड मिळाल्यावर ग्राहकाला आधारवर आधारित के.वाय.सी प्रमाणीकरण करून सोप्या सक्रिय करण्याच्या प्रक्रियेतून नंबर सक्रिय करता येईल. ग्राहकांना पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही प्लॅन्स मधून निवड करण्याचा किंवा एअरटेल नेटवर्कमध्ये पोर्टिंगसाठी एम.एन.पी सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध केला जाईल. ग्राहकांना प्रक्रिया सुलभ सक्रिय करण्याचा अनुभव लाभावा म्हणून ऑनलाइन लिंकवर जाऊन व्हिडिओ पाहता येईल.
याव्यतिरिक्त, अशा पद्धतीने सक्रिय केलेल्या सर्वांसाठी एअरटेल ग्राहकांना कोणतीही मदत हवी असल्यास, एअरटेल थँक्स अॅप द्वारे मदत केंद्रात जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल. नवीन ग्राहकांना 9810012345 वर कॉल करून सपोर्टशी संपर्क करून मदत मिळविता येईल. सिमकार्ड मिळाल्यावर ग्राहकांना 15 दिवसांच्या आत सिम सक्रिय करणे बंधनकारक असेल, जेणेकरून सुरळीत आणि त्रास न होता स्थित्यंतर करता येईल.
भागीदारीबद्दल भाष्य करताना, सिद्धार्थ शर्मा, सी.ई.ओ. कनेक्टेड होम्स आणि विपणन संचालक, भारती एअरटेल म्हणाले की: “एअरटेलमध्ये आम्ही जे काही करत आहोत त्यात ग्राहकांचे जीवन सोपे करणे केंद्रस्थानी ठेवलेले असते. आज आम्ही खूप आनंदी आहोत कारण आम्ही 16 शहरांमधील ग्राहकांच्या घरी 10 मिनिटांमध्ये सिमकार्ड पोहोचविण्यासाठी ब्लिंकिटसोबत भागीदारी केलेली आहे आणि कालांतराने आम्ही अतिरिक्त शहरांमध्ये या भागीदारीचा विस्तार करण्याची योजना आखलेली आहे.”
अल्बिंदर धिंडसा, संस्थापक आणि सी.ई.ओ. ब्लिंकिट म्हणाले, “ग्राहकांना वेळ आणि त्रास वाचविता यावा म्हणून निवडक शहरांमधील थेट ग्राहकांपर्यंत सिमकार्ड अवघ्या 10 मिनिटांत पोहोचवण्यासाठी आम्ही एअरटेल सोबत सहकार्य केलेले आहे. ब्लिंकिट पोहोचविण्याची काळजी घेत आहे, तर एअरटेल ग्राहकांना स्वयं के.वाय.सी पूर्ण करण्यास, त्यांचे सिम सक्रिय करण्यास आणि प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅन्सपैकी एक निवडण्यास सुलभता प्रदान करत आहे. ग्राहकाला नंबर पोर्टेबिलिटी सुद्धा निवडता येईल आणि हे सर्व त्यांच्या सोयीनुसार केले जाणार आहे.”
या लाँचच्या सुरुवातीच्या टप्प्यात सिम पोहोचविण्याची सेवा 16 प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध असेल, आणि यात मुंबई, अहमदाबाद, सुरत, चेन्नई, दिल्ली, गुडगाव, फरिदाबाद, सोनीपत, भोपाळ, इंदूर, बेंगळुरू, पुणे, लखनौ, कोलकाता, जयपूर आणि हैदराबाद ही महानगरे सामील आहेत.