एअरटेल वाय-फाय आणि पोस्टपेड ग्राहकांना ॲपल टीव्ही+ आणि ॲपल म्युझिक पाहण्यासाठी ॲपलने बरोबर भागीदारी
आता सर्व होम वाय-फाय ग्राहकांसाठी रु. 999 पासून सुरु होणाऱ्या प्रशुल्कांवर ॲपल टीव्ही+ उपलब्ध आहे
रु. 999 पेक्षा मोठा प्लॅन घेतलेल्या सर्व पोस्टपेड ग्राहकांना आता ॲपल टीव्ही+ पाहता येणार आहे आणि ॲपल म्युझिकचा आनंद 6 महिन्यांसाठी विनामूल्य उपभोगता येणार आहे
मुंबई : भारती एअरटेल आणि ॲपल यांनी एक धोरणात्मक भागीदारी केली आहे आणि एअरटेल ग्राहकांसाठी अतिशय कौतुक केल्या गेलेल्या ॲपल टीव्ही + स्ट्रीमिंग सेवा आणि ॲपल म्युझिक सादर करीत आहेत. रु. 999 पासून सुरू होणारे प्लॅन्स घेतलेल्या सर्व होम वाय-फाय ग्राहकांना ॲपल टीव्ही+ चे आकर्षक विषय पाहता येणार आहेत आणि फिरतीवर असताना अनेक डिव्हाइसेस वर विषय स्ट्रीम करण्याचा पर्याय मिळणार आहे. याशिवाय, रु. 999 पासून सुरू होणारे प्लॅन्स घेतलेल्या पोस्टपेड ग्राहकांना ॲपल टीव्ही+ पाहता येणार आहे आणि भारतीय व जागतिक संगीताचा मोठा कॅटलॉग असलेल्या ॲपल म्युझिकचा आनंद 6 महिन्यांसाठी विनामूल्य उपभोगता येणार आहे.
ॲपल सोबतच्या या धोरणात्मक भागीदारीमुळे एअरटेल ग्राहकांना खास प्रीमियम, पहायला आकर्षक नाटक (ड्रामा) आणि विनोदी मालिका (कॉमेडी सीरिज), कथाचित्रपट (फीचर फिल्म्स), अभूतपूर्व माहितीपट (डॉक्युमेंटरी) आणि मुलांचे व कौटुंबिक मनोरंजन पहायला मिळणार आहे. याव्यशिवाय, ॲपल म्युझिकची इंग्रजी, हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये अजोड लायब्ररी एक अद्वितीय ऑडिओ अनुभव सुनिश्चित करते.
सिद्धार्थ शर्मा- चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि सीईओ – कनेक्टेड होम्स, भारती एअरटेल म्हणाले की, “आमच्या ग्राहकांसाठी खास करून त्यांचे अतिशय कौतुक केले गेलेले व्हिडिओ आणि संगीत विषय सादर करून आम्ही अगदी उत्सुकतेने ॲपलसोबत कायापालट करून टाकणारी भागीदारी जाहीर करीत आहोत. हा सहयोग आमच्या लाखो होम वाय-फाय आणि पोस्टपेड ग्राहकांना एक विलक्षण संधी उपलब्ध करून देत आहे आणि यामुळे त्यांना ॲपलच्या प्रीमियम विषयाचा कॅटलॉग उपलब्ध होणार आहे. आम्हाला खात्री आहे की ही भागीदारी विषय पाहण्याचे भूदृश्य नव्याने निश्चित करेल आणि ग्राहकांमध्ये मनोरंजन अनुभवांसाठी एक नवीन मानक स्थापित करेल. आम्ही मिळून आमच्या बहुमूल्य ग्राहकांसाठी प्रीमियम मनोरंजन परिसंस्था प्रदान करण्याचे उद्दीष्ट ठेवलेले आहे.”
शालिनी पोद्दार, संचालिका, कंटेंट अँड सर्व्हिसेस, ॲपल इंडिया म्हणाल्या, “आम्ही उत्सुकतेने लाखो वापरकर्त्यांपर्यंत सर्वोत्कृष्ट संगीत सेवा, प्रीमियम टीव्ही मालिका आणि चित्रपट पोहोचविण्यासाठी एअरटेल सोबत भागीदारी केली आहे आणि त्यायोगे भारतभरातील प्रेक्षकांसाठी नव्याने शक्यता निश्चित करीत आहोत. या भागीदारीत प्रत्येकासाठी काहीतरी सादर केले जात असून ती पुरस्कार प्राप्त विषय, कथा आणि मनोरंजन सुलभपणे उपलब्ध करण्याच्या आमच्या धोरणात्मक ध्येयाशी सुसंगत आहे.”
या भागीदारीसह, ग्राहकांना सर्व ॲपल टीव्ही+ च्या मूळ मालिका आणि चित्रपट जाहिरात मुक्त पाहण्याचा आनंद उचलता येणार आहे आणि त्यात ‘टेड लासो’, ‘सेव्हरेन्स’, ‘द मॉर्निंग शो’, ‘स्लो हॉर्स’, ‘सायलो’ आणि ‘डिस्क्लेमर’ यांसारख्या जागतिक पुरस्कार विजेत्या हिट मालिका तसेच ‘वुल्फ्स’ आणि ‘द गॉर्ज’ यांसारखे ताजे चित्रपट सामील आहेत. याशिवाय, ग्राहकांना पुरस्कार विजेते ॲपल म्युझिक 6 महिने विनामूल्य उपलभ असेल, जो भारतीय आणि जागतिक संगीताचा सर्वात मोठा संग्रह आहे, तज्ञरीतीने तयार केलेल्या प्लेलिस्ट, कलाकारांच्या मुलाखती, ॲपल म्युझिक रेडिओ सोबत ॲपल म्युझिक सिंग आणि टाइम-सिंक केलेले लिरिक्स उपलब्ध होणार आहेत तसेच लॉसलेस ऑडिओ आणि तल्लीन करणाऱ्या स्पेशिअल ऑडिओ सारखी रोमांचक वैशिष्ट्ये उपलब्ध केले जाणार आहेत.
होम वाय-फाय प्लॅन्स:
प्लॅन्स | वेग | लिनियर टीव्ही चे फायदे | ओटीटी चे फायदे |
रु. 999 | 200 एमबीपीएस पर्यंत | ॲपल टीव्ही+, झी5, ॲमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, 23+ ओटीटी आणि बरेच काही | |
रु. 1099 | 200 एमबीपीएस पर्यंत | 350+ टीव्ही चॅनल्स (एचडी समाविष्ट आहे) | ॲपल टीव्ही+, झी5, ॲमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, 23+ ओटीटी आणि बरेच काही |
रु. 1599 | 300 एमबीपीएस पर्यंत | 350+ टीव्ही चॅनल्स (एचडी समाविष्ट आहे) | ॲपल टीव्ही+, झी5, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, 23+ ओटीटी आणि बरेच काही |
रु. 3999 | 1 जीबीपीएस पर्यंत | 350+ टीव्ही चॅनल्स (एचडी समाविष्ट आहे) | ॲपल टीव्ही+, झी5, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, 23+ ओटीटी आणि बरेच काही |
पोस्टपेड प्लॅन्स:
प्लॅन्स | डेटाचे फायदे | ॲड–ऑन सिम | ओटीटी चे फायदे |
रु. 999 | 150 जीबी | 2 | ॲपल टीव्ही+, ॲपल म्युझिक, ॲमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, एक्सट्रीम प्ले अनलिमिटेड (20+ ओटीटी) आणि बरेच काही |
रु. 1199 | 190 जीबी | 3 | ॲपल टीव्ही+, ॲपल म्युझिक, ॲमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, एक्सट्रीम प्ले अनलिमिटेड (20+ ओटीटी) आणि बरेच काही |
रु. 1399 | 240 जीबी | 3 | ॲपल टीव्ही+, ॲपल म्युझिक, नेटफ्लिक्स बेसिक अनलिमिटेड, ॲमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, एक्सस्ट्रीम प्ले अनलिमिटेड (20+ ओटीटी) आणि बरेच काही |
रु. 1749 | 320 जीबी | 4 | ॲपल टीव्ही+, ॲपल म्युझिक, नेटफ्लिक्स स्टँडर्ड अनलिमिटेड, ॲमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, एक्सट्रीम प्ले अनलिमिटेड (20+ ओटीटी) आणि बरेच काही |
ॲपल टीव्ही+ आणि ॲपल म्युझिकची भर घालून ॲमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, झी5 आणि जिओ हॉटस्टार सारख्या प्रमुख स्ट्रीमिंग कंपन्यांसह विद्यमान भागीदारी सोबत एअरटेल वायफाय ग्राहकांना चुटकीसरशी मनोरंजनाच्या पर्यायांचा अप्रतिम खजिना उपलब्ध करून देत आहे आणि म्हणून एअरटेलने आपल्या ग्राहकांना सकल व संपन्न डिजिटल जीवनशैली अनुभव प्रदान करण्यात अग्रगण्य म्हणून स्थान मजबूत केले आहे.