
मुंबई : अहील्याताईंचे कार्य कष्टकरी,व तळागाळातील लोकांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन डाॕ.उदय नारकर यांनी केले. कॉ.अहिल्याताई रांगणेकर यांच्या १०० व्या जन्मशताब्दी दिनी जनशक्ती ,वरळी येथील पक्षाच्या राज्य हेड क्वार्टरवर दि.८ जुलै २०२२ रोजी कॉ. अहिल्याताई रांगणेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यावेळी नारकर बोलत होते.
पक्षाचे राज्य सेक्रेटरी डाॕ.उदय नारकर व किसान सभेचे पुढारी किसन गुजर यांच्या हस्ते ताईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.अहील्याताई अमर रहे!,मार्क्सवाद- लेनिनवाद झिंदाबाद! अशा घोषणा दिल्या गेल्या.
प्रस्तावना अशोक पवार यांनी केली.बाबूराव मासावकर,प्रमिला मांजलकर,प्रविण मांजलकर,सोन्या गील,ॲड.आरमायटी इराणी,ॲड.विश्वास आवघडे यांनी अहील्याताईंच्या आठवणींना उजाळा दिला, अशी माहिती अशोक पवार,तालुका सेक्रेटरी माकप,मध्य मुंबई यांनी दिली.















