~ नाशिकमध्ये कार्यसंचालनांचा शुभारंभ ~
मुंबई, १३ डिसेंबर २०२१: यारा फर्टिलायझर्सचे पाठबळ असलेली पीक पोषणामधील जागतिक अग्रणी कृषी कंपनी अगोरो कार्बन अलायन्सची स्थापना त्यांच्या मुलभूत कार्यसंचालनांमध्ये कृषीमधील जागतिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी करण्यात आली. अगोरो कार्बनने पृथ्वी व शेतक-यांना लाभदायी ठरणा-या उत्तम फर्टिगेशन पद्धती निर्माण करण्यामध्ये अधिक साह्य करण्यासाठी नाशिकमध्ये कार्यसंचालनांना सुरूवात केली. बहुमूल्य बाजारपेठ असलेले महाराष्ट्र राज्य उच्च दृश्यमानतेमुळे प्रत्यक्ष आयात-निर्यात स्थितीशी संलग्न आहे. अगोरो कार्बन अलायन्स नवनवीन पद्धतींचा शोध घेत व शेतक-यांशी सहयोग करत त्यांना अधिक हवामानाशी संबंधित स्मार्ट पद्धतींचा अवलंब करण्यामध्ये साह्य करत आहे.
अगोरो कार्बन अलायन्सचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज सेन शर्मा म्हणाले, “आम्ही शेतक-यांसोबत काम करण्यासाठी आणि त्यांना आमच्या उपक्रमामध्ये सामावून घेत त्यांच्या विकासाची खात्री घेण्यासाठी उत्सुक आहोत. सध्या आम्ही महाराष्ट्रातील बागायती पिकांवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि प्रांतामध्ये उपक्रम विस्तारित करत विश्वसनीय कृषी-कर्ज निर्माण करणारे कार्बन प्रकल्प स्थापित करण्याची आशा व्यक्त करतो. पंजाब व हरियाणामध्ये यशस्वी शुभारंभानंतर नाशिकमध्ये आमच्या कार्यसंचालनांना सुरूवात करण्यात आली आहे आणि आमचा या बाजारपेठेचा अधिकाधिक लाभ घेण्याचा मनसुबा आहे.”
कृषी तंत्रांसंबधित विद्यमान स्थिती आणि शेतक-यांची सामाजिक-आर्थिक वास्तविकता लक्षात घेणे टप्प्याटप्प्याने यशस्वी धोरणासंदर्भात काम सुरू करण्यापूर्वी महत्त्वाचे आहे. यामुळे शेतक-यांना अधिक हवामान अनुकूल स्मार्ट कृषी पद्धतींचा अवलंब करण्यास मदत होईल. अगोरो कार्बन अलायन्स पीक व्यवस्थापन पद्धत म्हणून फर्टिगेशनच्या माध्यमातून ही बाब साध्य करत आहे. ही नवीन संकल्पना नसली तरी अलिकडील वर्षांमध्ये या पद्धतीला अधिक लोकप्रियता व अवधान मिळाले आहे. ही पद्धत कृषी पोषक कार्यक्षमतेला चालना देते, तसेच जल व्यवस्थापन देखील सुधारते.
नाशिकमधील एक शेतकरी मनोज जाधव म्हणाले, “आम्हा शेतक-यांना उत्पादकता व बाजारपेठ उपलब्धतेसंदर्भात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अगोरो कार्बन अलायन्स अचूक माहिती देते आणि आम्हाला स्मार्ट कृषीला चालना देणा-या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यामध्ये साह्य करते. ज्यामुळे आमच्या पीक उत्पादनामध्ये वाढ होऊन आमचे उत्पन्न दुप्पट होण्यास, तसेच आम्ही आत्मनिर्भर होण्यास मदत होते.”