मुंबई, (निसार अली) : मालवणीसह मनोरी, मढ, गोराई, भाईंदर , ठाणे, रायगड ,पालघर, कलिना, वांद्रे ,कुलाबा येथील ईस्ट इंडियन बहुल भागात अगेरा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी शेतात पिकवले धान्य देवाला अर्पण करून देवाचे आभार मानायची प्रथा आहे. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी बाफहिरा नगर मालवणीतून फादर फ्रान्सिस जेवीअर यांच्या नेतृत्वात बैल गाडीची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महिलांनी विशेष ईस्ट इंडियन लुगडे आणि पुरुषांनी सुरखास परिधान केले होते तसेच ईस्ट इंडियन बँड वंझूतरच्या तालावर थिरकत खारोडीच्या चेपल पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी विशेष गोड पदार्थ व जेवण बनवून समाजात एक-दुसऱ्यांना त्याच वाटप ही करण्यात येते. ईस्ट इंडियन समाजातील मारिओ ग्रेसीएस, टिप्सन परेरा, डॉन लिग्रेस, फादर आग्नेलो फर्नांडिस, नेल्सन पटेल, नगरसेविका स्टेफी किणी आदींसह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.