लाइफस्टाइल कम्युनिटी कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेत वाढ
मुंबई, 3 जुलै : भारतातील वेगाने वृद्धींगत होणा-या लाइफस्टाइल कम्युनिटी-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या ट्रेलने ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने चिनी अॅप्स बंदीच्या घेतलेल्या धाडसी निर्णयानंतर ३.५ दशलक्षांपेक्षा जास्त डाउनलोड्स आणि २.५ दशलक्ष कंटेंट क्रिएटर्ससह अॅप डाउनलोडमध्येही वाढ अनुभवली आहे.
भारतातील ‘व्हिडिओ पिनटरेस्ट’ अशी लोकप्रियता मिळवलेला ट्रेल हा यूझर्सना त्यांचे अनुभव, सूचना, विश्लेषणे शेअर करण्याची सुविधा देतो. हा मजकूर आरोग्य, फिटनेस, सौंदर्य, त्वचेची काळजी, प्रवास, चित्रपट समीक्षण, पाककृती तसेच गृह सजावट अशा विविध विषयांवर असू शकतो. या लाइफस्टाइल व्होगिंग प्लॅटफॉर्मवर यूझर्स त्यांच्या स्थानिक भाषेत ५ मिनिटांचे व्हिडिओ तयार करू शकतात. व्हॉग्समध्ये उल्लेख झालेली उत्पादने खरेदी करण्यासाठी यूझर्ससाठी ‘शॉप’ सुविधाही देण्यात आली आहेत. याशिवाय, प्लॅटफॉर्मवर युझर्सना पुरस्कार, बक्षीसेही मिळवता येतात.
ट्रेलचे सहसंस्थापक पुलकित अग्रवाल म्हणाले, “अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो व अभिनंदन करतो. टिकटॉक आणि सर्व चिनी अॅपच्या कंटेंट निर्मात्यांचे आम्ही खुल्या दिलाने स्वागत करतो आणि १०० टक्के भारतीय असलेल्या ट्रेलवर येण्याचे आवाहन करतो. भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल सोशल अॅप असल्याने आम्ही यूझर्सचा खासगीपणा आणि डाटा सुरक्षित राहिल तसेच आम्ही आमच्या देशाच्या सीमांपर्यंतच मर्यादित राहूत, याची खात्री देतो.”
ट्रेलने नुकतेच ३ भारतीय भाषांमध्ये प्लॅटफॉर्म लांच केले. मराठी, कन्नड आणि बंगाली भाषांच्या समावेषानंतर आता तो एूकूण ८ भाषांमध्ये उपलब्ध आहे. २०१७ मध्ये स्थापना झाल्यापासून ट्रेलने देशभरातील प्रादेशिक ग्राहकांच्या मनोरंजनविषयक गरजा भागवण्यासाठी वचनबद्ध आहे. देशभरात ६०% यूझर्ससह ट्रेल टू टीयर आणि ३ टीयर शहरांमध्येही विस्तारलेला आहे.