रत्नागिरी : नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. दरम्यान चिपळूण तालुक्यातील भिले ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत सौ. आदिती अविनाश गुडेकर या बहुमताने विजयी झाल्या आहेत. त्यांच्या या विजयाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. दरम्यान ग्रामस्थांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही नवनिर्वाचित सरपंच सौ. आदिती गुडेकर यांनी दिली आहे.
भिले ग्रामपंचायतच्या सदस्यपदी उमेश उत्तम सकपाळ , सौ . विद्या संजय सकपाळ , सौ . श्रावणी सुनिल गुरव , सौ श्यामल सतीश निगडे , सुनिल तुकाराम सुतार मंगेश गोविंद भुवड हे बिनविरोध निवडून आले आहेत.
तर सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ. आदिती गुडेकर यांनी 708 पैकी तब्बल 421 मतं मिळवत विजय संपादन केला. सौ. गुडेकर या उच्चशिक्षित असून त्यांना सामाजिक क्षेत्राची आवड आहे. त्यांच्या विजयाबद्दल सध्या त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.