पुणे : एंडियंट (एनवायएसई – एडीएनटी) या ऑटोमोटिव्ह आसन क्षेत्रातील कंपनीने आज पुण्यात अत्याधुनिक आसन प्रोटोटायपिंग आणि चाचणी सुविधा केंद्राच्या उद्घाटनाची घोषणा केली. हे केंद्र भारतात बांधण्यात आलेले अशा प्रकारचे सर्वात मोठे केंद्र असल्याचेही कंपनीने जाहीर केले. या केंद्राचे बांधकाम हे एडियंटच्या पुण्यातील सध्याच्या तांत्रिक केंद्राचा मोठा विस्तार आहे.
नवे केंद्र २०१८ च्या अखेरीस खुले होईल. त्याद्वारे पुण्यातील सध्याचे तांत्रिक केंद्र, कम्प्युटर एडेड इंजिनियरिंगचे (सीएई) एडियंटमधील जागतिक केंद्र, कम्प्युटर एडेड डिझाइन (सीएडी), ऑटोमेशन आणि फिनाइट एलिमेंट अनालिसिस (एफईए) स्टिम्युलेशन एक्सपर्टीज यांची क्षमता वाढवण्यासाठी फिजिकल टेस्टिंग सुविधा पुरवली जाईल. सन २००० मध्ये पहिल्यांदा प्रस्थापित करण्यात आलेल्या एडियंटच्या इंडिया टेक सेंटरमध्ये आज एक हजार अभियंते कार्यरत असून त्यातील अंदाजे ८५० अभियंते पुण्यात कार्यरत आहेत, तर १५० अभियंते एडियंटच्या भारताबाहेरील जागतिक कामांत कार्यरत आहेत.
सध्याच्या टेक सेंटरशेजारील २० हजार एम स्क्वेअर जागेत वसलेले नवे प्रोटोटायपिंग आणि चाचणी सुविधा केंद्र पूर्ण प्रमाणात प्रोटोटायपिंग, टेस्टिंग आणि उच्च क्षमतेचे केंद्र एडियंटला भारतात जागतिक ग्राहक आणि नियामक मापदंडानुसार उत्पादनाची संपूर्ण पडताळणी करण्याची क्षमता देईल. या केंद्रात पूर्णपणे हायड्रोलिक अक्सिलरेशन स्लेड टेस्ट यंत्रणा असेल जी प्रीसिजन पल्स मॅचिंग, फुल पेलोड क्षमता आणि ऑन- बोर्ड कॅमेऱ्यातून उच्च- वेग असलेले व्हिडिओ कॅप्चर इत्यादी सोयी पुरवेल. केंद्रातील ६ अक्सिस शेकर टेबल, सेमी अँकोइक चेंबर एनएचव्ही (नॉइज, व्हायब्रेशन आणि हार्शनेस – आवाज, कंपन आणि कठोरता) आणि रस्त्यावर टिकाऊ राहण्याच्या क्षमतेचे विश्लेषण करेल.
“३० दशलक्ष डॉलर्सची ही गुंतवणूक एडियंटसाठी महत्त्वाचा टप्पा आहे, कारण या निमित्ताने आम्ही जगभरातील आमचे अभियांत्रिकी अस्तित्व विस्तारत आहोत तसेच ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्पादन विकास सुविधा व नाविन्यपूर्ण क्षमता देत आहोत,” असे डॉ. डेटलेफ जुयरेस, उपाध्यक्ष, इंजिनियरिंग णि मुख्य तांत्रिक अधिकारी, एडियंट यांनी सांगितले. ‘या नव्या केंद्रासह आम्हाला जागतिक तसेच स्थानिक लाँच उपक्रमासाठी आवश्यक डिझाइन व उत्पादन पडताळणीसह उत्पादन विकास इथे पुण्यातच अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह करता येईल व त्याची भारतातील वाहन उद्योगात कुणाहीशी बरोबरी होणार नाही.’
‘एडियंटला गेल्या कित्येक वर्षांपासून भारतासारख्या वैविध्यपूर्ण, समृद्ध आणि सर्जनशील प्रेरणा देणाऱ्या वातावरणात डिझाइनवर लक्ष केंद्रिंत करण्याचा फायदा झाला आहे. आमची भारतीय तांत्रिक केंद्राची टाम एडियंटच्या जागतिक औद्योगिक डिझाइन कामकाजात, आजच्या ग्राहकांना डिझाइन्स पुरवम्यात आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या अनुभवाला आकार देण्यासाठी विविध संकल्पनांचा विचार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलत आहे,’ असे रिचर्ड चंग, उपाध्यक्ष, इनोव्हेशन विभाग, एडियंट यांनी सांगितले.