रत्नागिरी (आरकेजी): वादग्रस्त ठरलेल्या नाणार प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर सभेत केली.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार आईल रिफायनरी विरोधात आज कात्रादेवी इथे जाहीर सभा घेतली. या सभेत शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही, मात्र कोणीही आपल्या जमिनी कोणाला विकू नका असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत केले. तर दुसरीकडे या पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा केली. शिनसेनेने अधिसुचना रद्दचे पत्र आणावे, अशी मागणी इथल्या प्रकल्पग्रस्तांनी केली होती. त्याला उत्तर देताना सुभाष देसाई यांनी अधिसुचना रद्द केली असून तसे आदेश आपण आपल्या खात्याला देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.