रत्नागिरी, (आरकेजी) : पर्ससीन जाळ्याद्वारे मासेमारी करण्याचा परवाना नसतानाही मासेमारी करणार्या सहा बोटींवर मत्स्य विभागाने कारवाई केली.
ट्रॉलिंग परवाना असलेल्या बोटींवर मत्स्य विभागाच्या अधिकार्याना कारवाईमध्ये पर्ससीन जाळी आढळून आली.० ज्या बोटींवर पर्ससीन जाळी मिळून आली आहेत, त्या बोटींचा परवानाच रद्द केला जाणार आहे. दरम्यान ज्या 6 बोटी पकडण्यात आल्या आहेत, त्या बोटींवर आवश्यक ती सर्व कागदपत्रे नव्हती. बोट मालकांकडून ती कागदपत्रे मागविण्यात आली असून त्यानुसार मत्स्य विभागाकडून पुढील कारवाई केली जाणार असल्याचं मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आनंद पालव यांनी सांगितलं. दरम्यान, एक सप्टेंबरपासून मासेमारी सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ३६ जणांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.