रत्नागिरी,(आरकेजी) : मुंबई – गोवा महामार्गावर एक खासगी बस पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये एक ठार तर 12 जण जखमी झाले. संगमेश्वर जवळच्या रामकुंडच्या वळणावर हा अपघात झाला.
आज सकाळी मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी खासगी बस संगमेश्वर जवळील रामकुंडच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं पलटी झाली. जखमींवर संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.