मालाड, (निसार अली) : मढ -मार्वे रोड वर आज संध्याकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकी चालक शरूख पटेल(वय अंदाजे 22 ) या एमएचबी कॉलनी मालवणी गेट क्र 8 येथे राहणार्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर शरुखच्या मागे बसलेली तरुणी अपघातात गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शरूखचा मृतदेह भगवती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. गुन्हा नोंद करून पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले. पुढील तपास करत असल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी दिली.
गेल्या 15 दिवसात या रोडवर घडलेला हा दुसरा मोठा अपघात आहे. एका टेम्पोने 4 शाळकरी मुलांना धडक दिली होती, त्यात 13 वर्षीय मुलगी जागीच मृत्यू पावली होती.