
रमेश गोरुले( ४२ रा. निवरे मेढे) हे रिक्षा घेवून मेढे ते लांजा असा प्रवास करत होते. याचवेळी दाभोळे गावातील एका वळणावर भरधाव कारने रिक्षाला जोरदार धडक दिली.
जखमींची नावे : रिक्षा चालक रमेश काशिराम गोरुले (४२), मेघना अनिल सनगरे (१२),अंजली अनिल सनगरे (३८), कार्तिक अनिल सनगरे (२), अनिल आत्माराम सनगरे (४२) हे जखमी झाले आहेत. त्यातील मेघना आणि रमेश यांची प्रकृती चिंताजनक आहे.
त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवरुख पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.