प्रख्यात गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक हे दखलपत्र दिले जाणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, ३० जुलै, सायंकाळी ७ वाजता पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, २ रा मजला, हिंदुस्थानी हॉल, प्रभादेवी येथे होणार आहे. सविता हांडे ही या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणार आहे. दखलपत्र वाचनात सुदीप ठोसर, प्रतिभा शिंपी, सिद्धेश भोसले, तेजस बावीस्कर या कलाकारांचा सहभाग आहे. जुलै महिन्याचे मानकरी म्हणून कवी, गीतकार शांताराम नांदगावकर यांना संगीतमय आदरांजली वाहण्यात येणार आहे. शब्दांकन सुवर्णा गुराम यांचे आहे. आजवर पद्मश्री वामन केंद्रे, शिवाजी साटम, अलका कुबल-आठल्ये, जयश्री खाडीलकर-पांडे, प्रेमानंद गज्वी, दिनकर गांगल, अशोक हांडे, गंगाराम गवाणकर, विसुभाऊ बापट, अरूण म्हात्रे, अनंत पणशीकर, रविंद्र आवटी, मधु खामकर, प्रदीप म्हापसेकर, यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. कार्यक्रम विनामूल्य असल्याचे कला केंद्रच्या संचालिका नंदिनी नंदकुमार पाटील यांनी कळवले आहे.
गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या उपस्थितीत अभियान सन्मान सोहळा
मुंबई : स्वातंत्र्यसैनिक डॉ.परशुराम पाटील कलाकेंद्र ही शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या ‘कलाश्रम’ अंतर्गत ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राबविण्यात येतो. ३० जुलै २०१९ ला या उपक्रमाचे सतरावे पुष्प आहे. स्वत:बरोबर समाजासाठी वैविध्यपूर्ण काम करणार्या व्यक्तींची या उपक्रमात दखल घेतली जाते. त्यांच्या कर्तृत्त्वाचे आलेख मांडणारे ‘दखलपत्र’ त्यांना देण्यात येते. यंदा संगीतप्रेमी, वादक दत्तात्रय मोरे, चित्रपट, नाटक, मालिका ज्येष्ठ कलावंत सुमंत मस्तकार, अध्यात्मिक आदर्श माता इंदिरा कुदळे, अभिनेता, खेळाडू मित कोळवणकर यांचे जुलै महिन्यातील स्मृतीदिनाचे निमित्त घेऊन हे ‘दखलपत्र’ गीतकार, संगीतकार, लेखक रत्नाकर पिळणकर, चित्रपट, नाट्य समिक्षक, पत्रकार अजय परचुरे, रांगोळी नैपुण्य प्रशिक्षिका मंजिरी प्रभुलकर, अभिनेता, दिग्दर्शक संदेश जाधव यांना विविध क्षेत्रात सर्वोत्तम काम केल्याच्या निमित्ताने दिले जाणार आहे.