रत्नागिरी : मा.ना.श्री उदय सामंत यांच्या संकल्पनेनुसार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने कास्टिंग डिरेक्टर श्री. रोहन मापुस्कर यांची अभिनय कार्यशाळा दिनांक 29 व 30 जुलै 2023 रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी दिली आहे.
या कार्यशाळेमध्ये अभिनय, आवाज, करियर आणि ऑडिशन याबाबत सविस्तर आणि सखोल माहिती दिली जाणार आहे.
श्री रोहन मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कास्टिंग डिरेक्ट आहेत त्यांनी अजून पर्यंत थ्री इडियट्स, लगे रहो मुन्नाभाई, फेरारी की सवारी, ठाकरे , काही सांगायचंय, उनाड अशा गाजलेल्या अनेक चित्रपटाचे कास्टिंग श्री रोहन मापुसकर यांच्याकडून करण्यात आले होते.
यापूर्वी पण नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्या वतीने रत्नागिरी मध्ये श्री मापूसकर यांची अभिनय कार्यशाळा घेण्यात आली होती. त्याचा रत्नागिरीतील रंगकर्मींना खूप मोठा फायदा झाला आहे. अनेकांना चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
सदरचे शिबिर 29 व 30 जुलै 2023 या कालावधीत राधाबाई शेटे सभागृह गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे. सदर शिबिरात सहभागी होण्याकरता वयाची कोणतीही अट नाही. तसेच शिबिरासाठी म्हणून नाममात्र शुल्क रक्कम रुपये 300/- इतके असणार आहे.
तरी इच्छुकांनी शिबिरात सहभागी होण्याकरता खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
प्रफुल घाग- 9422429301
सनातन रेडीज – 9766543678
अमेय धोपटकर – 8888033621
प्रा. डॉ. आनंद आंबेकर-7020737400