
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरीतील तरुण उद्योजक अभिजित पाटणकर याच्या हत्येप्रकरणात रत्नागिरी न्यायालयाने आज तीन आरोपीना जन्मठेपेची तर एकाला सक्तमजुरीनी शिक्षा सुनावली.
सप्टेंबर 2015 मध्ये रत्नागिरीतील कोकण रेल्वेच्या पुलाजवळ अभिजितचा गोळ्या घातलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने हत्येमागचा मुख्य आरोपी मोईन काझी याला उत्तर प्रदेशमधून जेरबंद केलं होतं. हत्येप्रकरणात मोईन काझीसह अन्य तीन जणांचा सहभाग आढळून आला होता. आर्थिक व्यवहारातून हत्या झाली. मुख्य आरोपी मोईन काझी याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होते. अवघ्या 2 वर्षात या हत्या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा झाली.















