
चिपळूण : आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यासमोर येते, ती पंढरपूरची वारी! यावर्षी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मंगळवार दिनांक १६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत चिपळूणमध्ये प्रशांत यादव मित्र मंडळ आयोजित ‘अभंगवाणी’ भक्त संगीताच्या बहारदार कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम चिपळूण-बहादूरशेखनाका येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनातील सहकार सभागृहात होणार आहे, अशी माहिती वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिली.

वाशिष्ठी डेअरी व प्रशांत यादव मित्र मंडळातर्फे यापूर्वी लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात चिपळूण तालुक्यातील जनेतसाठी मोफत अस्थिरुग्ण तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले होते. यावेळी जोथपूर येथील डॉ. पराशर यांनी ८०० हुन अधिक रुग्णांची तपासणी केली होती. तसेच इंडियन रेडक्रास सोसासटी ब्लड सेंटर, रत्नागिरी, यशवंतराव चव्हाण ब्लड बैंक कराड, श्री.स्वामी समर्थ ब्लड बैंक-बीकेएल वालावलकर हॉस्पीटल डेरवण तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ३६० शिबिरार्थीनी रक्तदान केले होते. नंतर ५ ते जानेवारी ७ जानेवारी २०२४ दरम्यान कृषी महोत्सव २०२४ पार पडले. या महोत्सवाचे मान्यवरांसह जनतेने कौतुक केले. दिनांक १० एप्रिल रोजी पालखी नृत्य स्पर्धा झाली.
पुन्हा यावर्षी दिनांक २२ ते २४ एप्रिल दरम्यान चिपळूण- संगमेश्वर येथील जनतेसाठी जोधपूर येथील डॉ. पराशर यांचे मोफत अस्थिरुग्ण तपासणी व उपचार शिबीर पार पडले. तर आता जून महिन्यात चिपळूण बाजारपेठेतील भाजीपाला व फळविक्रेत्यांना छत्री वाटप झाले.
संगमेश्वर तालुक्यातील आशा सेविका रेनकोट वाटप, चिपळुण- संगमेश्वर तालुक्यातील शाळांमशील विद्यार्थ्यांना मोफत वहया वाटप तर १ जुलै रोजी कृषी मेळावा असे विविध उपक्रम पार पडले.
या लोकोपयोगी उपक्रमांची दखल घेऊन उद्योजक प्रशांत यादव यांना पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये शिवभक्त कोकण व निल क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे साहित्य संघ नाटयमंदिर येथे ‘मी कोकणी उद्योजक’ पुरस्कार, रत्नागिरी जिल्हा फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एकंदरीत वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी शेतकऱ्यांना दिशा देण्याबरोबरच लोकोउपयोगी उपक्रम राबवून वेगळे अस्तित्व सिद्ध केले आहे.
तर आता आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ‘अभंगवाणी’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी गायक वरद केळकर, स्मिता करंदीकर, अभिषेक सुतार, सृष्टी कुलकर्णी बहारदार गायन करणार आहेत. तर ऑर्गन संतोष आठवले, तबला वादन निखिल रानडे, पखवाज मंगेश चव्हाण, तालवाद्य सुहास सोहनी करणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. तरी या कार्यक्रमाला चिपळूणवासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.