मुंबई : सारीज-टू-सुट्स या अमेरिकेत मुख्यालय असणाऱ्या व प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन सीएनएन न्यूज अँकर पट्टी त्रिपाठी यांनी स्थापन केलेल्या एनजीओने 2020 या वर्षासाठीच्या ‘सारीज-टू-सुट्स’ कॅलेंडरमध्ये नामवंत सामाजिक कार्यकर्त्या, वकील व माजी प्रशासकीय अधिकारी आभा सिंह यांचा समावेश केला आहे.
कायदा, सरकारी प्रशासन, उद्योजकता व मेडिसिन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 यशस्वी इंडो-अमेरिकन स्त्रियांबरोबर आभा सिंह यांचाही समावेश करण्यात आला आहे.
सारीज-टू-सुट्स कॅलेंडरने आभा सिंह यांच्या लोकसेवेच्या उद्दिष्टाचा सारासार विचार करून त्यांच्या प्रतिमेला साजेल अशी कॅप्शन दिली आहे: “जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा इतरांना शिकवा. जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा इतरांना द्या.” आभा सिंह जीवनाकडे पाहताना समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे यश इतरांच्या कल्याणासाठी समर्पित करतात.
याबरोबरच, कॅलेंडरने आभा सिंह यांचे महत्त्वाचे स्थान, योगदान व बांधिलकी यांचा उल्लेख पुढील शब्दांत केला आहे: “समाजाच्या कल्याणासाठी काम करण्यावर लक्ष केंद्रित करणे शक्य व्हावे महणून स्वेच्छेने करिअर सोडून दिले, असे किती जण सांगतील? महिलांसाठी संघर्ष करता यावा म्हणून आभा सिंह यांनी भारतातील प्रशासकीय करिअरचा त्याग केला. स्पष्टवक्त्या स्त्रीवादी आभा सिंह यांच्या कार्यामुळे त्या भारतातील एक अतिशय कार्यमग्न व लोकप्रिय वकील ठरल्या आहेत. इतकेच नाही, तर लोकांच्या सेवा करण्याच्या ध्यासामुळे त्यांनी न्यायालयामध्ये अनेक जनहित याचिका दाखल केल्या आहेत. स्त्री-पुरुष समानता व न्याय यासाठी त्यांनी केलेले कार्य विचारात घेता, त्यांचे नावे आवर्जून समाविष्ट करायला हवे असेच आहे.”
आभा सिंह यांनी सांगितले, “2020 साठीच्या सारीज-टू-सुट्स कॅलेंडरमध्ये माझा समावेश करण्यात आला, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी मानवतेच्या मूल्याचे पालन करत लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. हे काम कधीही न संपणारे आहे आणि जगभर महिला सबलीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांच्या यादीमध्ये माझाही समावेश करून मला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी सारीज-टू-सुट्सची आभारी आहे.”
वैयक्तिक बाबतीत, आभा सिंह यांचा वाढदिवस डिसेंबर महिन्यात असतो आणि कॅलेंडरमध्ये त्यांचा समावेश याच महिन्यामध्ये करण्यात आला आहे.
आभा सिंह यांनी मानवतेच्या मूल्याचे पालन करत लोकांची सेवा करण्यासाठी प्रशासकीय सेवेतील उत्तम करिअर सोडून दिले. त्या भारतीय समाजातील अनेक वाईट गोष्टींविरोधी झगडत होत्या – जसे, महिलांच्या बाबतीतील हिंसा व भेदभाव, भारतातील भ्रष्टाचार व मानवाधिकारांचे उल्लंघन. या संदर्भात त्यांनी भ्रष्टाचारविरोधी कायद्यापासून दिव्यांगांसाठी इमारती सुविधा पुरवण्यापर्यंत विविध विषयांवरील अनेक रिट पिटिशनमध्ये व जनहित याचिकांमध्ये सहभाग घेतला आहे किंवा दाखल केल्या आहेत.
एक वकील म्हणून, आभा सिंह यांनी त्यांच्या अशीलांच्या केसेस हाताळण्यातील हातोटी दर्शवली आहे. महिलांच्या संदर्भातील कायद्यातील त्यांचे कौशल्य व हातोटी सर्वश्रुत आहे. त्यांनी मुंबईतील विविध न्यायालयांत वैवाहिक व गुन्हेगारी खटले लढले आहेत. सलमान खान प्रकरणामध्ये त्ये इंटरव्हेनरही होत्या. त्यामध्ये त्यांनी सुनावणीला विलंब झाल्यामुळे न्यायाच्या बाबतीत कसा अन्याय झाला, हे अधोरेखित केले. त्यांनी सातत्याने केलेल्या अपिलांमुळे ही केस मुंबईतील कोर्ट ऑफ सेशन्समध्ये हस्तांतरित करण्यात आला. तेथे खटल्याच्या प्रक्रियेचा वेग वाढला व निकालही लागला.
समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी अनेक प्रतिष्ठित संस्थांनी आभा सिंह यांना विविध पुरस्कारांनी गौरवले आहे. अनेक प्रसिद्ध व यशस्वी महिलांमधून, 2020 साठीच्या सारीज-टू-सुट्स कॅलेंडरसाठी निवड होणे, हे आभा सिंह यांच्या उत्कृष्ट कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या कौतुकाचे प्रतिक आहे