
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : शिंदे- फडणवीस सरकार मध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळात डोंबिवलिचे आमदार रवींद्र चव्हाण यांना केबिनेट मंत्रीपद मिळाले आणि डोंबिवलीकरांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी जल्लोषही करण्यात आला. डोंबिवलीचे आमदार चव्हाण यांच्या कामाची होपोचपावती म्हणावी लागेल. यापूर्वीही चव्हाण यांनी राज्यमंत्री मिळाले होते. आपल्यातील एक डोंबिवलीकर आज केबिनेट मंत्री झाल्याने खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचा विकास होईल असा ठाम विश्वास भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.
भाजपावर जनतेने ठेवलेला विश्वास आणि समाजकार्य पाहून केडीएसीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकित भाजपला जास्तीत जास्त मते मिळतील. केडीएमसीत भाजपचा महापौर बसेल आणि कल्याण-डोंबिवलीचा अधिकाधिक विकास भाजप करून दाखवील असेही परब यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्त ‘ घर घर तिरंगा’ अंतर्गत देशवासियांनी १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसात तिरंगा लावावा अशी विंनती केली. तर डोंबिवली शहरात विद्यार्थी वाहतूक बसेसची मर्यादा ठरवावी.कारण बसेस मध्ये विद्यार्थी असल्याने बसचालकाने याचे भान ठेवावे .यासाठी डोंबिवली वाहतूक पोलीस उपशाखेत भाजपाच्या वतीने पत्र देण्यात आले आहे.तरी वाहतूक पोलिसांनी डोंबिवलीतील प्रत्येक शाळेत याबाबत सूचना द्यावी अशी विंनती केल्याचेही परब यांनी सांगितले.















