मालाड, ता.19(वार्ताहर) : दिनांक 19 जून 2021 रोजी राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॉक क्रमांक 46 मालाड पश्चिम विधानसभाच्या वतिने मार्वे रोड, मालाड पश्चिम येथील लुथर्न सेंटर आश्रमात लहान मुलांसोबत साजरा केला. धान्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ब्लॉक अध्यक्ष रविंद्र मोगरे, संतोष चिकणे सचिव मुंबई काँग्रेस नानु सोढा महासचिव मुंबई काँग्रेस, संगीता अंथोनी, डेनिस चेट्टी, मुरुगन पिल्ले, रोशन कांबळे, पूजा जवेरी, चिराग ढेडिया, अमर ठाकोर, सागर चेउलकर, स्वप्निल खडपकर, कैलास आंबरे, झकेरीया लकडावाला, महेश धावडे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.