मालाड, ता.20 (वार्ताहर) : जोगेश्वरी पूर्व येथील सामजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी गणेश हिरवे यांच्या वतीने शंभर मान्यवरांना तुळशीचं रोपटं व गोष्टीच पुस्तक भेट देऊन आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आषाढीचे महत्व जाणून हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या आधीही विविध प्रसंगी हिरवे सरांनी मागील वीस-बावीस वर्षात जवळपास दहा ते बारा हजार पुस्तक नागरिकांना व विविध वाचनालयांना विनामूल्य भेट दिली आहेत. ज्यांना मोफत तुळशीचं रोपटं व पुस्तक हवं आहे, त्यांनी गणेश हिरवे यांच्याशी 9920581878 वर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.