मुंबई: मतदार बंधू आणि भगिनींनो,उ द्या दिनांक १३ मे रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या चौथ्या चरणाच्या मतदानात अंदाजे २.२८ कोटी मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
लोकशाही जिवंत राहण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. या मतदारसंघांतील प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावावा, असे आवाहन माकप करत आहे.
आपल्या लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीला विजयी करा .धर्मांध,भ्रष्ट, हुकूमशाही भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा पराभव करा. लोकशाही, संविधान, देश वाचवा असे माकपचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे.