मालाड, ता.17(निसार अली) : मालवणीत आम आदमी पार्टीच्या वतीने केंद्रातील मोदी सरकार विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या जीएनसिटीडी विधयेका विरोधात हे आंदोलन केले. आंदोलकांचा म्हणणं होतं की या विधयेका मुळे जनतेने निवडून दिलेल्या दिल्लीच्या आम आदमी सरकारचे अधिकार कमी करून केंद्र सरकार ले. गव्हर्नर यांना अधिक अधिकार देऊन जनतेचा अपमान करत आहे. आप चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भाजप सरकारला भीती वाटत असल्याने अशा छुप्या पद्धतीने दिल्ली सरकारच्या कामात अडथळा निर्माण करण्यासाठी हे विधयेक संमत केले, असा आरोप यावेळी केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली. लारझी व्हर्गिस, हाजी मसूद, अलफोन्स रोझरीओ, कुरेशी फातिमा व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.