साऊथ कोरियात सुवर्ण , कांस्य व रौप्य पदकाची कमाई
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
साऊथ कोरिया येथे झालेल्या १५ व्या वर्ल्ड तायक्वांडो कल्चरल एक्स्पो आंतरराष्ट्रीय पूमसे आणि क्यूरोगी स्पर्धेत मुंबईतील सिद्धकला तायक्वांडो अकादमीतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण , कांस्य आणि रौप्य पदकाची कमाई केली. ही स्पर्धा २१ जुलै ते २६ जुलै दरम्यान वॉन जेलबोक दो मुजजू या शहरात पार पडली. या स्पर्धेत जवळ जवळ ४५ विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात सिद्धकला तायक्वांडो अकादमीतील खेळाडूंनी पुमसे आणि क्यूरोगी या दोन प्रकारात उत्तम कामगिरी करत भारताचे नाव जगभरात रोशन केले आहे.
पुमसे आणि क्युरोगी या दोन्ही प्रकारात युनिव्हर्सल हाय स्कूलची तनिष्का वेल्हाळने २ सुवर्ण पदक , जानकीदेवी पब्लिक स्कूलचा आरव चव्हाणने २ सुवर्ण , आर्या चव्हाणने २ सुवर्ण तर अवनी चव्हाणने २ सुवर्ण पदक पटकावले. जमनाबाई नरसी स्कूल मधून जीवांश चंदोकने २ सुवर्ण , रीयान पटेलने १ सुवर्ण आणि १ कांस्य पदक मिळवले. हेरिटेज एक्सपरेनटियल लर्निग इंटरनॅशनल स्कूलचा निवेश आलुवालीयाने १ सुवर्ण पदक व १ रौप्य पदक तर सिनियर गटात चंदन परीडाने १ सुवर्ण पदक , १ रौप्य पदक , स्वप्नील शिंदे १ सुवर्ण पदक १ कांस्य पदक , विक्रांत देसाई १ सुवर्ण पदक १ रौप्य पदक यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंचे प्रतिनिधित्व प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांनी केले.