मुंबई : कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने कोकण मार्गावर विशेष चार फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी आणि सीएसटी ते सावंतवाडी रोड दरम्यान या गाड्या चालविण्यात येणार असून ७ जानेवारीला गाड्यांचे बुकींग सुरु होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.
मुंबईतून भराडीदेवीच्या जत्रेला कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेता कोकण रेल्वेने जादा गाड्या चालवणार आहे. यामुळे कोकण वासियांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. २६ जानेवारीला ०११६१ ही गाडी एलटीटी स्थानकातून मध्यरात्री १.१० वाजता सुटेल व २६ जानेवारीला ०११६२ ही गाडी सावंतवाडी रोड स्थानकातून दुपारी १२.३० वाजता रवाना होईल. – ०११५७ सीएसएमटी – सावंतवाडी ही गाडी २७ जानेवारीला सीएसएमटी स्थानकातून मध्यरात्री ००.२० वाजता – ०११५८ ही गाडी २७ जानेवारीला दुपारी २ वाजता सावंतवाडी इथून रवाना होणार – या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकांत थांबा दिला आहे.