२०० पेक्षा जास्त गुणवंत विदयार्थी सन्मानित व आर्थिक दुर्बल कुटुंबातील ५ विदयार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत
मुंबई-(शांताराम गुडेकर )”आम्ही वडाळा पूर्वकर ” या संस्था परीवार तर्फे वडाळा पूर्व विभागात सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याच प्रमाणे यावर्षी देखील सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जोपासत या संस्थेमार्फत दहावी – बारावी परीक्षेत यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा व घर संसार तसेच चूल – मुल सांभाळुन परीक्षेत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेल्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार समारंभ कोरबा मिठागर मुंबई मनपा शाळा येथे संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आर.एम. भट शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, गांधी हॉस्पिटलचे प्रमुख सर्जन डॉ. गजाजन भगत , एस. आय. डब्लू. एस हायस्कुलचे शिक्षक संजय सकपाळ, साहित्यिक , लेखिका स्मिताक्षी चिपळूणकर, नाडकर्णी पार्क मनपा शाळेचे माजी शिक्षक जयप्रकाश धुरी, जाधव नॉलेज सेंटरचे संस्थापक जे. के. जाधव, साहित्यिक चंद्रकांत जगताप, समाजसेविक असुंता डिसोझा, आदर्श शिक्षक , समाजसेवक गणेश हिरवे आदी उपस्थित होते.आम्ही वडाळा पूर्वकर हि संस्था त्या विभागातील कार्यकर्ते व महिला वर्ग यांना सोबत घेऊन गेली चार वर्ष सामाजिक उपक्रम राबवत आहेत. कोरोना काळात सर्व ठप्प असताना देखील गरजूंना धान्य वाटप करणे, आरोग्य शिबिरं राबवणे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे असे महत्वपूर्ण उपक्रम राबवत असते. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” या बाबासाहेबांच्या ब्रीद वाक्याची आठवण करून देत ,शिकले पाहिजे त्यातून समाज घडत असतो त्याच बरोबर अंगी अन्य गुण सुद्धा अंकीकारले पाहिजेत असे मत व्यक्त करून माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले. आपला समाजात आणि आजूबाजूला अनेक रत्न घडलेले असतात आणि आणि घडत आहे पण त्यांच्या कडे कुणाचे हि लक्ष जात नाही आणि असेच काही रत्न वडाळा पूर्व भागात सुद्धा दडलेले आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व असे अजून रत्न घडत राहावेत ह्या साठी हा उपक्रम हाती घेतल्याचे संस्थेचे सर्वेसर्वा शिवाजी फणसेकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान वडाळा पूर्व विभागातील आर्थिक दुर्बल घटकातील पाच विदयार्थ्यांना आर्थिक मदत व वडाळा येथील राज्यात व देशात नाव उंचावणाऱ्या व कर्तृत्ववान कार्य करणाऱ्या राष्ट्रीय कबड्डीपटू पंकज मोहिते, कोण बनेगा करोडपती विजेता अक्षय कदम , रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल विजेती आकांक्षा हांडे, कोरोना काळात दिवस रात्र सेवा देणारे डॉ. शैलेश टेम्भूर्डे, यदा कदाचित नाटकाचे २५० प्रयोगात कला सादर करणारी अभिनेत्री सोनाली नाडकर, सुप्रसिद्ध कच्चीढोल वादक मिलिंद जंगम, क्रिकेटपट्टू यश तांबे, मंत्रालय ते रेल्वे भिंतीवर चित्रातून जनजागृती करणारे चित्रकार स्वप्नील कदम, ऑस्कर पुरस्कार विजेते गायक विशाल पवार, आठ वर्षाची जिमण्यास्टिक गोल्ड मेडल विजेती सान्वी कासले या शिलदारांचा वडाळा रत्न पुरस्कार- २०२२ या पुरस्काराने गौरविण्यात आले.त्याच बरोबर जवळजवळ २०० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तरी हि जे विद्यार्थी उपस्थित नव्हते त्यांना संस्थेचे कार्यकर्ते स्वतः भेट देऊन त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे. कारण ज्यांनी यश संपादन केले आहे आणि नाव नोंदणी केली होती त्यांचा सुद्धा आदर झाला पाहिजे असे मत संस्थेच्या कार्यकारणीचे आहे. सौ. सुचिता कोलंबेकर , सौ. संगीता घोडके , सौ. संगीता निकाळे , सौ सुषमा कदम, सौ. संगीता मोरे, सौ. योगेश्री पवार आणि पौर्णिमा गडकर या अंगणवाडी सेविका घर – संसार आणि नोकरी सांभाळून १० च्या परीक्षेत उत्तीर्ण बद्दल यांचे देखील सत्कार करण्यात आले. या सोहळ्यासाठी विद्यार्थी गुणगौरव सोहळ अध्यक्ष शिवाजी फणसेकर माजी नगरसेविका प्रेसीला ताई कदम, माहिती अधिकार – पोलीस मित्र कार्यकर्ते , पत्रकार समाजसेवक निलेश कोकमकर, कॅमेरामन प्रवीण मागाडे, फोटोग्राफर अण्णा साहेब हांडे, उडान स्टुडिओचे संचालक संतोष फाऊंडेशनचे अध्यक्ष हरेश शिवलकर साहेब उपस्थित होते.मनीषा डांगळे , सुशांत दोडमनी ,. कुमार बनसोडे , प्रकाश आरोळे,दीपाली उके, प्रेसीला कदम, महेंद्र गायकवाड,विशाल जाधव, राजा सिंग सिंगावले , राहुल सातपुते, मोनिका खंडागळे, अर्चना कुलकर्णी, सुरेखा दुबे, मनीषा मागाडे, भालचंद्र गायकवाड,संदीप जाधव तुषार राजे कांबळे विशाल जाधव,अकबर भाई पटेल, आनंद उके चेतन गायकवाड, मस्के आणि कार्यकर्त्यानी हा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली व सोहळा यशस्वी पार पाडला.