
दापोली तालुक्यातील टांगर बौद्धवाडी, पार्टेवाडी व कदमवाडीमधील ग्रामस्थांची अंतर्गत रस्ता करण्याची व गणपती मंदिरासमोरील सभामंडप बांधण्याची मागणी आमदार श्री. योगेशदादा कदम यांनी शासनाच्या मूलभूत सुविधा अंतर्गत (२५/१५) मधून पूर्ण केली.
यावेळी आमदार योगेश कदम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत टांगरवासियांना दिलेला शब्द पूर्ण केला, याबाबत मी समाधानी आहे. पण हा शब्द पूर्ण करताना भरपूर
अडचणींना सामोरे जावे लागले, त्याचे कारण युती शासनाच्या काळात दापोली विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी मंजुर झालेल्या तब्बल २७ कोटी रुपयांच्या निधीला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली. मी मा. मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून दापोली मतदारसंघाची पर्यटन, भौगोलिक, शेती, फळबागायती व शैक्षणिक याविषयीची समस्या सांगितली व निधीवरची स्थगिती उठवावी अशी विनंती केली. एवढ्यावरच न थांबता न थकता सतत मंत्रालय दरबारी स्थगित निधी करीता पाठपुरावा केला म्हणून सदर निधी पून्हा मंजूर झाला आणि आपल्या मतदारसंघातील विकासा वेग कायम राहिल्याचं योगेश कदम यावेळी म्हणाले.

गावाच्या विकासाकरिता सरपंच अभ्यासू व सतत पाठपुरावा करणारा असायला हवा, मग काहीच अडचण येत नाही. तूमच्या गावच्या सरपंचांचा विकास कामांबाबत सततचा तगादा हेच गावच्या विकासासाठी लाभदायक आहे. यापुढेही आपणा सर्वांच्या सहकार्याने आपण टांगर गावचा विकास साधणार आहे असे मनोगत आमदार श्री. योगेशदादा कदम यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी जि. प. समाजकल्याण समिती सभापती श्री. भगवान घाडगे, उपतालुकाप्रमुख श्री. प्रकाश कालेकर, दापोली कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू सहसचिव श्री. सुनिल दळवी, उद्योजक श्री. शैलेश कदम, विभागप्रमुख श्री. सुनिल जाधव, उपविभागप्रमुख श्री. संतोष दळवी, सरपंच श्री. प्रशांत पार्टे, उपशाखाप्रमुख श्री. शौकत पेढेकर, माजी शाखाप्रमुख श्री. संदिप सुतार, माजी सरपंच सौ. एकता प्रशांत पार्टे, माजी सरपंच श्री. मकबूल कोंढेकर, टांगर मुंबई मंडळाचे सदस्य श्री. वसंत पाटील, श्री. अशोक मर्चंडे, श्री. सुरेंद्र पाटील, श्री. भालचंद्र तांबुटकर, सौ. मयेकर यांसहित पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.