
लांजा दि.२८ः आमदारकीची तिसरी टर्म होऊनही मंत्रिपद मिळाले नाही तरीही आज सत्ताबदलाच्या सारीपाटात मंत्रीपदाची ऑफर धुडकावून पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या आमदार डॉ.राजन साळवी यांचे आज लांजानगरीत लांजा बस स्थानक येथे लांजा शिवसेनच्यावातीने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा विजय असो…. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला… राजन साळवी आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा गगनभेदी घोषणा देत जल्लोषात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले त्यावेळी शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शविली.
त्यानंतर लांजा शहरातील बसवेश्वर सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये आमदार डॉ.राजन साळवी यांनी शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे. कोण कुठे गेले तरीही जिल्ह्यातील शिवसैनिक आपल्या पाठीशी उभा असेल असे शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांना मी सांगून आलो आहे. तसेच हीच ताकद शिवसेनेचा भगवा राज्यभर डौलाने फडकवेल. ज्या शिवसेनेमुळे, ज्या शिवसैनिकांमुळे मी तीनवेळा आमदार झालो. त्या शिवसेनेशी व शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब तसेच युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्यासोबत सदैव राहणार असा ठाम आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच यापूर्वी ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली त्यांची काय अवस्था झाली हे सर्वांना माहितीच आहे असे सांगितले.















