
मुंबई , (निसार अली) : मालाड पश्चिमेत दोन टर्म आमदार असलेले काँग्रेसचे आमदार अस्लम शेख हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा सद्या सुरू आहे. मात्र, ही अफवा असल्याचे आमदार शेख यांनी सांगितले आहे. या अफवेच्या निमित्ताने मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ प्रकाशझोतात आला आहे.
जाणून घेऊ मतदार संघातील स्थिती :
एकेकाळी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा
बालेकिल्ला समजला जात होता. मालाड हा काँग्रेसचा भक्कम गड होता. चाळीस वर्ष काँग्रेस चे मालाड पश्चिम विभागात 35 वर्ष राज्य आहे. त्यांचे आमदार मोठ्या मताधिक्याने जिंकून आले. अनुपचंद शाह आमदार होते ते नंतर खासदारही झाले. प्रसिद्ध अभिनेता गोविंदा येथून खासदार झाला होता. नंतर काँग्रेसने शिवसेनेतून आलेले संजय निरूपम यांना उमेदवारी दिली आणि तेही निवडून आले. 2O14 च्या मोदी लाटेत संजय निरुपम यांचा भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी लाखोच्या मताधिक्याने पराभव केला. यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार अस्लम शेख हे मालाड पश्चिम येथून जिंकले. त्यानंतर काँग्रेसमधील माजी आमदार रमेश ठाकूर हेही भाजप मध्ये गेले. 2O19 च्या लोकसभेत पुन्हा भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसने बॉलीवूडमधून आयात केलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली. त्यांनीही गोपाळ शेट्टींपुढे तगडे आव्हान उभे केले होते. मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आपसातील मतभेदांमुळे आणि कमी होत असलेली कार्यकर्त्यांची संख्या यामुळे मातोंडकर यांना लाखोंच्या मताधिक्यानी हार पत्करावी लागली. त्यानंतर आमदार अस्लम शेख काहीसे निराश दिसले. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये बोलावल्याची चर्चा मतदारसंघात होती. शिवसेनेचे एक वरिष्ठ पदाधिकारी आणि उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्यांनी आमदार अस्लम शेख यांच्याशी दोन वेळी संपर्क साधला. त्यांच्याशी शिवसेनाप्रवेशाबाबत चर्चा झाल्याची चर्चा सुरू झाली. तेव्हापासून शेख हे सेनेत जाणार की भाजपात? या बाबत चर्चा झडू लागल्या. त्यांची युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी बैठक झाल्याचीही चर्चा सुरू झाली होती. मात्र,आमदार अस्लम शेख यांना शिवसेनेत प्रवेशाबाबत विचारल्यावर त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितले.
या मतदारसंघातील गेल्या चाळीस वर्षातील आमदार :
अनुपचंद शाह 1 टर्म कॉंग्रेस
चंद्रकांत गोसालीया 2 टर्म काँग्रेस
माधवराव मराठे भाजप 1 टर्म
पि .यु .मेहता 2 टर्म काँग्रेस
अस्लम शेख 2 टर्म काँग्रेस
मालाड पश्चिमेतील मालवणी विभागातील दलित मुस्लिम यांच्या मतांच्या पाठबळावर काँग्रेसने अधिपत्य गाजवले आहे.
मालवणीतून काँग्रेसला भरभरून मत :
अस्लम शेख यांचे वडील 2 टर्म नागरसेवक
अस्लम शेख दोन टर्म नगरसेवक व दोन टर्म आमदार
कमरजहाँ सिद्दीकी अस्लम शेख यांनी बहीण दोन टर्म नगरसेविका आहेत.
मालाड पश्चिमेत काँग्रेसचे 8 पैकी 4 नगरसेवक भाजप चे 3 शिवसेनेचा 1 अशी सद्याची स्थिती आहे.














