मुंबई: पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी (दि.२८ ) बस कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पोलादपूरजवळ झालेल्या आजच्या दुर्दैवी अपघातामधे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील अनेक अधिकारी व कर्मचारी तसेच बसचे चालक यांना प्राण गमवावे लागल्याचे समजून आपणास धक्का बसला व तीव्र दुःख झाले. सर्व मृतांच्या कुटुंबियांना व आप्तजनांना मी आपल्या शोकसंवेदना कळवित आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.