रत्नागिरी : कोल्हापूरला जोडणार्या आंबा घाटात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळला. गायतोंड स्थानाच्या वरच्या बाजूस खोल दरीत हा मृतदेह फेकून देण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार तरुणाचे वय अंदाजे २५ वर्षे आहे. अन्य ठिकाणी त्याची हत्या करून दरीत फेकण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
मृतदेहाच्या आजूबाजूला या तरूणाच्या पायातील शूज आणि गॉगल या व्यतिरिक्त कोणत्याही वस्तू सापडल्या नाहीत. रत्नागिरी-देवरूख पोलीस तपास करत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा चार जिल्ह्यांतील बेपत्ता नागरिकांची माहिती गोळा केली जात आहे. या तरूणाची ओळख अद्यापही पटलेली नाही. हत्येचे गूढ उकल्याण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.