
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाने आधुनिक युगातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थी आदर्श बनला पाहिजे यादृष्टीने शिक्षकही प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन मंडळाचे विश्वस्त आणि कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी केले.
आगाशे विद्यामंदिरात विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, पालक प्रतिनिधी विकास पावसकर, पावसकर, सुजित हत्तरगे, हत्तरगे, मंदार निमकर, चंद्रकांत कारकर, कारकर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या प्राजक्ता कदम, भारती खेडेकर, गीता सावंत, सुधीर शिंदे, सोमनाथ दुकले, ईशा रायंगणकर, सर्व शिक्षकांचा सत्कार केला.
एमटीएस (जळगाव) स्पर्धेतील गुणवंत- गार्गी पावसकर, आर्यन कारकर, पूनम हत्तरगे. ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा- सुवर्णपदक- आदित्य दामले, मधुरा पाटील, रौप्यपदक- आदिती शेलार, स्वरा मुसळे, स्वराज साळुंखे, अक्षय माळवदे, स्मिता टापरे, यथार्थ शिवलकर, सात्विक मालंडकर. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कथाकथन स्पर्धा- आदित्य दामले, नभा बडे, ईशा वायंगणकर, मैत्रेयी काळे, दिव्यांका घाटगे, वेदांग कुलाबकर, भार्गवी केळकर. महाराष्ट्र ज्ञानपीठ गणित परीक्षा सोहम गावडे, आदित्य मणचेकर. देशभक्तीपर गीत गायन- मैत्रेयी काळे, सृष्टी तेंडुलकर, आभा म्हैसकर, सूर्याक्ष रेमणे, विघ्नेश घाणेकर, मनाली जोशी, आर्या नागवेकर, दिशिता खेडेकर, शर्वाणी मुळ्ये, तीर्था मयेकर. ज्युनियर लीडर स्पर्धा- वरद निमकर, अथर्व डांगे, ऋग्वेद फडके, अनीश मटकर, अथर्व शिवलकर, तनया कोळवणकर, अनीश ठाकुरदेसाई, गार्गी पावसकर, दिया बारस्कर, चिन्मय मुळ्ये, पवन नागवेकर, पृथा हळदणकर, वेदांग कुलाबकर.














