मुंबई (शांताराम गुडेकर ) : राज्यात जनतेचे अनेक प्रश्न,महागाई वाढलेली आहे,बेरोजगारांना रोजगार, शेतकऱ्यांना हमी भाव असे आवासून प्रश्न असताना भारतीय जनता पार्टी,शिवसेना ,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेसाठी भांडत आहेत.मात्र जनतेच्या प्रश्नावर यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मात्र आगामी काळात पुन्हा जोमाने जनता दल (सेक्युलर) पक्ष पूर्ण ताकदीनिशी आवाज उठवून लढा देण्याचे काम करेल असे नव्याने जनता दल (से) च्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेले नाथाभाऊ शेवाळे बोलत होते.त्यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बोलत होते.
सध्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा,शरद पाटील यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या सूचनेनुसार राष्ट्रीय अध्यक्ष,माजी पंतप्रधान एच.डी. दैवेगोडा यांच्या आदेशानुसार त्यांची महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी नाथाभाऊ शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याअगोदर ते कार्याध्यक्ष म्हणून काम करत होते.तरुण तडफदार व पक्ष संघटनेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे व्यक्तिमत्व असलेले,त्याचबरोबर प्रशासन विभागात प्रचंड ओळख असलेले नाथाभाऊ शेवाळे हे भविष्यात पक्षाला नक्कीच उभारी देतील असे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी आभार व्यक्त करताना मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर,महिला आघाडी ज्योती बडेकर,पुणे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,ईशान्य मुंबई अध्यक्ष संजीवकुमार,युवा मुंबई अध्यक्ष केतन कदम,संदेश गायकवाड, यांच्यासह पक्षातील अनेक मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.