मुंबई, (निसार अली) : मालवणीतील गुरुकुल शाळेतील आफ्रिन अन्सारी या विद्यार्थिनीने मरीन लाईन्स येथे झालेल्या मुंबई विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार मीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धा दिनांक 30 आणि 31 ऑगस्ट रोजी मुंबई विभागीय अॅथलेटिक्स संघाने आयोजित केल्या होत्या. मालवणीतील एका छोट्याश्या शाळेतील अपुऱ्या सुविधा आणि गरीब कुटुंबातील आफ्रिनच्या या यशामुळे तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाल्याने तिच्या शाळेत आणि कुटुंबासह परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे. तिला वंदे मातरम स्पोर्ट्स अकादमीने प्रशिक्षण दिले आहे.