रत्नागिरी दि. ४ : शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत सन 2021-22 या वर्षासाठी दिला जाणाऱ्या आदर्श शाळा पुरस्कारांसाठी ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांची आदर्श शाळा पुरस्कार योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम 06 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन तळ मजला, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी यांनी कळविले आहे.