
मुंबई, (निसार अली) : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चिंचपाडा येथे अनुभव शिक्षा केंद्र मुंबई आणि बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटना यांच्या वतीने गुरुवारी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा झाला. या वेळी कार्यकर्त्यांनी जनजागॄती करणारी गीते गात कार्यक्रमाची सुरुवात केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सुनीता देवलवार यांनी विज्ञान आणि चमत्कार या विषयी माहिती दिली. तसेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत वैज्ञानिक प्रयोग त्यांनी सादर केला. मान्यवरांनी आदिवासींचे प्रश्न व हक्क यासंबंधी आपल्या भाषणातून माहिती दिली. बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र ठाकूर, सचिव शशांक रंगाळे, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वन अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते, अशी माहिती बाळा आखाडे यांनी दिली.















