रत्नागिरी : आचारसंहितेपूर्वी गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भात लॉटरी निघणार असल्याची मााहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी आज दिली आहे. हायकोर्टाने जी कमिटी नेमली आहे त्या कमिटी समोर 28 ते 30 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे व म्हाडा आपलं म्हणणं मांडणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलीय. यामध्ये बॉम्बे डाइंग मिल, बॉम्बे डाइंग स्प्रिंग मिल, श्रीनिवासन मिलचा समावेश असून लवकरच या सोडती बाबत निर्णय होईल असं सामंत यांनी स्पष्ट केलं.