नवी दिल्ली – दूरसंवाद विभागाने आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्न करण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ केली आहे. त्यासाठी तीन नव्या पद्धतींचा अवलंब करता येईल. या पद्धतींच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक आधारशी OTP, App किंवा IVRS सुविधेच्या माध्यमातून संलग्न करणे शक्य होईल, यासाठी मोबाईल वापरकर्त्यांना कोणत्याही केंद्रात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.।यासंदर्भात दूरसंवाद विभागाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्येष्ठ नागरिक, गंभीर स्वरुपाचे रुग्ण आणि दिव्यांगांना फेर तपासणीची सुविधा घरपोच मिळावी, अशी शिफारस केली आहे.