रत्नागिरी, 29 June : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10.97 मिमी तर एकूण 98.73 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड निरंक , दापोली 1.43 मिमी, खेड 1.61 मिमी, गुहागर 8.55 मिमी, चिपळूण 14.75 मिमी, संगमेश्वर 13.90 मिमी, रत्नागिरी 20.92 मिमी, राजापूर 15.97 मिमी, लांजा 21.60 पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या सकाळी 10 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती निरंक आहे.