ओपनसिग्नल मोबाइल एक्सपिरीयन्स अहवाल – एप्रिल 2020 ची ठळक वैशिष्ट्ये
· महानगरांसह 32 शहरांत व्हीआयएल ग्राहकांनी अनुभवला डाउनलोडचा सर्वाधिक वेग
· महानगरांसह 29 शहरांत अपलोडिंगचा सर्वोच्च वेग
· व्हिडिओ अनुभवात व्हीआयएलने नोंदवली सर्वोच्च सुधारणा 24 शहरांत आघाडीवर, तर 16 शहरांत दुसऱ्या क्रमांकावर
· 4जी व्हॉइस अप अनुभवात व्हीआयएल पहिल्या क्रमांकावर
मुंबई : ओपनसिग्नल या द्वैवार्षिक नेटवर्क एक्सपिरीयन्स अहवालाच्या नुकत्याच आलेल्या आवृत्तीनुसार व्होडाफोन आयडिया लिमिटेडने डाऊनलोड आणि अपलोडचा वेग तसेच व्हिडिओचा अनुभव इत्यादी निकषांवर आघाडीचे स्थान मिळवले आहे.
भारतातील 91 टक्के जिल्हे याआधीच एकत्रित झाले असून एकत्रित नेटवर्कची ताकद आणि व्होडाफोन आयडिया टर्बोनेट 4जी अंतर्गत एकत्रित स्पेक्ट्रमने भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सुधारणा दर्शवण्यास सुरुवात केली आहे.
ओपनसिग्नल एप्रिल 2020 अहवालामध्ये 48 शहरांतील डेटाचा वेग आणि अनुभवांचे विश्लेषण करण्यात आले असून याआधीच्या आवृत्तीसाठी 42 शहरांचा विचार केला गेला होता. व्हीआयएलने भारतातील इतर ऑपरेटर्सच्या तुलनेत विविध निकषांवर शहरी गुणवारीत सर्वाधिक सुधारणा दर्शवलेली आहे.
1. ब्रँड व्होडाफोनसाठी 10.8 एमबीपीएसचा 4जी डाउनलोड वेग (52.1 टक्के सुधारणा) आणि ब्रँड आयडियासाठी 10.3 एमबीपीएस (56.1 टक्क्यांची सुधारणा) – एप्रिल 20 अहवालातील पुढच्या क्रमांकाच्या सर्वोत्तम ऑपरेटरशी तुलना करता 15.9 टक्क्यांची वाढ, तर एप्रिल 2019 च्या अहवालात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, चंदीगढ, अहमादाबाद यांसह 32 प्रमुख शहरांत डाउनलोड वेगाच्या बाबतीत व्हीआयएल पहिल्या क्रमांकावर होती.
2. 48 शहरांपैकी 29 शहरांत अपलोड वेगाच्या बाबतीतही व्होडाफोन आयडियाने पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. व्होडाफोन आयडियाने प्रमुख शहरे व महानगरांमध्ये अपलोडचा सर्वाधिक वेग नोंदवला असून या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, अहमदाबाद, चंदीगढ यांचा समावेश आहे. ट्राय मायस्पीडसह इतर प्रमुख टेस्टिंग एजन्सीजच्या अद्यावत चाचणी अहवालांतही व्हीआयएल अपलोड वेगाच्या बाबतीत सातत्याने आघाडीवर राहिली आहे.
3. 4जी व्हिडिओ अनुभव – महत्त्वाचे नेटवर्क अनुभव निदर्शक – व्होडाफोन आयडियाने परत एकदा आघाडीचे स्थान मिळवले असून ब्रँड व्होडाफोनने वार्षिक पातळीवर 30 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, तर ब्रँड आयडियाने 21.4 टक्क्यांची वाढ दर्शवली आहे. ऑपरेटर 48 पैकी 24 शहरांत आघाडीवर असून हा या अहवालातील मापदंड ठरला आहे. त्याशिवाय ऑपरेटर 16 शहरांत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
4. 4जी व्हॉइस अप अनुभव – या अहवालात समाविष्ट करण्यात आलेला निकष – व्होडाफोन आयडियाचे स्थान क्रमांक – 1
व्होडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांना आणि सध्याच्या परिस्थितीतही सेवा देण्यासाठी बांधील आहे. जगातील सर्वात मोठे नेटवर्क एकत्रीकरण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसह साध्य करण्यात आलेल्या क्षमता विकासामुळे व्हीआयएलला सामाजिक अंतराचे नियमपालन तसेच वर्क फ्रॉम होमच्या काळात ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत झाली आहे. व्हीआयएलने विनाअडथळा सेवा दिली आहे आणि ग्राहकांसाठी सर्व सेवा टचपॉइंट्स उपलब्ध राहातील तसेच त्यांना माय व्होडाफोन आणि माय आयडिया अपद्वारे कायम डिजिटल पातळीवर कनेक्टेड राहाता येईल यासाठी टीम्स सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत.
व्होडाफोन आयडिया टर्बोनेट 4जी अधिक जलद डाउनलोड, अपलोड वेग आणि दर्जेदार व्हिडिओ अनुभव देत असून ग्राहकांना व्होडाफोन प्ले आणि आयडिया मूव्हीज व टीव्ही अप्सवरील नव्या डिजिटल माहिती- मनोरंजन कंटेटचा आनंद घेणे शक्य करत आहे














