रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): दापोली तालुक्यातील एका ८ वर्षीय बालिकेवर २५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. त्यामुळे दापोली तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल गुरुवार ता.२८ रोजी दापोली खेड मार्गावरील एका गावात एक ८ वर्षीय बालिका सायंकाळी ६ वाजता शिकवणीला गेली होती. सदर बालिका नैसर्गिक विधीसाठी गेली असता, या शिकवणी घेणाऱ्या महिलेच्या दिराने हि मुलगी शौचालयात गेली असता ती एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर हि मुलगी परत शिकवणीला आली तेव्हा तेथील मुलांनी तिच्या पायावरील रक्ताचे डाग पाहिल्यावर तिला लागले असल्याचे शिकवणी घेणाऱ्या बाईना सांगितले. मात्र त्यांना वेगळी शंका आल्याने त्यांनी तिला घरी नेऊन पालकांच्या ताब्यात दिले. मात्र या मुलीच्या वेदना थांबत नसल्याने पालकांनी तिच्याकडे चौकशी केली असता या बालिकेने झालेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर या बालिकेला उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. रात्री उशिरा दापोली पोलीस ठाण्यात या मुलीच्या पालकांनी संशयित स्वप्नील माने याचे विरोधात तक्रार दाखल केल्यावर त्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे या पंचक्रोशीत संतापाचे वातावरण असून हा संशयित काल रात्री पासून फरार आहे. गावातील तरुण व पोलिसांचे पथक यांनी त्याचा एकत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये करत आहेत.