
यावर्षी मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र काही दिवस पावसाने पुन्हा पाठ फिरवली. पण सध्या गेले काही दिवस जिल्ह्यात चांगला पाऊस होत आहे. आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.
दरम्यान यावर्षी जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 1607 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पाऊस सुरू झाल्यापासून आजपर्यंत सर्वाधिक पाऊस राजापूर आणि दापोली तालुक्यात झाला आहे. राजापूरमध्ये 1854 मिमी, तर दापोलीत 1800 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गुहागरमध्ये 1704 मिमी आणि लांजा तालुक्यात 1698 मिमी पावसाची नोंद झाली आहे.