मुंबई : ७० व्या बेस्ट दिनानिमित्त प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदीर येथे बेस्ट उपक्रमाच्या ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उदघाटन माननीय खासदार अनिल देसाई यांच्या शुभहस्ते आज सकाळी पार पडले. त्यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, विद्यमान आमदार आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष माननीय सुनील शिंदे, बेस्ट समिती सदस्य राजेश कुसळे, रत्ना महाले तसेच बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हे प्रदर्शन उद्या सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.