नवी दिल्ली : बौद्ध धर्माचा भारताकडून आशियाकडे आणि आंतरखंडीय प्रवास म्हणजे केवळ अध्यात्मिक नव्हता तर ज्ञान आणि शिकवण यांचे समृद्ध भांडार तसेच कला, ध्यानधारणा याचाही हा प्रवास होता, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते.
पर्यटन क्षेत्रात खाजगी क्षेत्र आणि समाजाचीही महत्त्वाची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. पर्यटन क्षेत्रात व्यवसायाची उदंड क्षमता आहे असे सांगून हे क्षेत्र स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारक्षम असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. पर्यटन मंत्रालयाने ही परिषद आयोजित केली