रत्नागिरी : गावठी दारूची वाहतूक करणा-या एका तरूणाला चिपळूण तालुक्यातील रामपूर येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी 63 हजार 350 रूपयांची 1225 लिटर गावठी दारू आणि 2 लाख रूपयांची महिंद्रा मॅक्स गाडी जप्त करण्यात आली.
तरुणाचं नाव अमर अंकुश मयेकर असे आहे. तो वालोपे-गणेशवाडी राहतो. मॅक्स गाडीतून अमर गावठी दारूची वाहतूक करीत होता. रामपूर बसस्थानकाच्या बाजूला ही ही गाडी उभी करून ठेवली होती. ग्रामस्थांना गाडीचा संशय आल्याने त्यांनी रामपूर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी येऊन पोलिसांनी तपासणी केली असता 35 लिटर दारूचे 35 कॅन गाडीत सापडले.