नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाने फेसबुक आणि झारखंडमधल्या रांची येथील सायबर पीस फाउंडेशनच्या सहकार्याने महाविद्यालय-विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरता उपक्रम सुरु केला आहे. महिलांमध्ये डिजिटल साक्षरतेला चालना देणे, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता, त्यांची हाताळणी व ते रोखणे याबाबत जागरुकता निर्माण करणे, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. देशातल्या महत्वाच्या शहरांमधल्या विद्यापीठातल्या 60 हजार महिलांना इंटरनेट, सोशल मिडिया आणि ई-मेलच्या सुरक्षित वापराबाबत याअंतर्गत माहिती देण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी आज लोकसभेत एका उत्तरात ही माहिती दिली.